
#सीमा सत्याग्रही पुंडलिक चव्हाण,अन्नपूर्णा चव्हाण यांना श्रध्दांजली!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सीमा सत्याग्रही व नंदगड गावचे सुपूत्र पुडलिंक चव्हाण व कै माजी आमदार व्ही.वाय.चव्हाण यांच्या पत्नी अन्नपूर्णा चव्हाण यांची शोकसभा शिवस्मारक चौकातील सभागृहात पार पडली.
शोकसभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दिगंबर पाटील होते.
यावेळी दीपप्रज्वलन व फोटोचे पुजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना माजी आमदार दिंगबर पाटील म्हणाले की,सीमासत्याग्रही पुडलिंक मामा चव्हाण हे शांत व्यक्तीमत्व असलेले.वयाच्या १६व्यावर्षी समितीच्या चळवळीत अग्रभागी राहिले, त्यानी सीमा चळवळीत काम करताना कधीही तत्वांशी तडजोड केली नाही. सीमाप्रश्न सुटावा ही त्यांची शेवटच्या श्वासापर्यत ईच्छा होती. सीमाप्रश्नाची हीच त्याना खरी श्रध्दांजली आहे.
माजी आमदार कै. व्ही वाय चव्हाण यांच्या पत्नी व तालुका विकास बोर्डाच्या माजी सदस्या अन्नपूर्णा चव्हाण यानी सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सीमाचळवळीच्या कार्यात दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. यांच्या जाण्याने सीमा चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. तेव्हा सीमाप्रश्नाची सोडवणुक हीच त्याना खरी श्रध्दांजली ठरेल.असे प्रतिपादन माजी आमदार दिगंबर पाटील यांनी केले.
यावेळी आबासाहेब दळवी ,विलास बेळगावकर ,शंकर पाटील,मारूती परमेकर,अभिजीत सरदेसाई,नारायण लाड,अरूण सरदेसाई,यशवंत बिरजे,सुधीर पाटील,मुरलीधर पाटील आधीची श्रध्दांजली पर भाषणे झाली.
यावेळी तालुक्यातील शेकडो समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.