
#नगराध्यक्षा सौ.मिनाक्षी बैलुरकर यांच्याहस्ते शुभारंभ!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील नगरपंचायतीच्यावतीने एससी,एसटी राखीव निधी अंतर्गत खानापूर शहरात पाच ठिकाणी सोमवारी दि. ३ रोजी सौर दिव्ये बसविण्यात आले.
यावेळी नवनिर्वाचित नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ.मिनाक्षी प्रकाश बैलुरकर यांच्या शुभहस्ते विधिवत पुजा करून सौर दिवे बसविण्यास प्रारंभ करण्यात आला.
याशुभारंभ प्रसंगी नगराध्यक्षा सौ.मिनाक्षी बैलुरकर,उपनगराध्यक्षा जया भुतकी, माजी स्थायी कमिटी चेअरमन व विद्यमान नगरसेवक प्रकाश बैलुरकर, माजी नगराध्यक्ष विद्यामान नगरसेवक मजहर खानापूर ,लक्ष्मण मादार, नगरपंचायतीचे चिफ आँफिसर संतोष कुरबेट,अभियंता तिरूपती राठोड, व कर्मचारी तसेच मल्लेशी पोळ, व इतर नागरीक उपस्थित होते.