
#अध्यक्ष महादेव दळवी व पदाधिकार्याच्यावतीने नुतन तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांचा सत्कार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका रेशन दुकानदार संघटनेतर्फे खानापूर तालुक्याचे नूतन तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांचा सोमवारी दि ५ रोजी सत्कार करण्यात आला.
यावेळी खानापूर तालुका रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष महादेव दळवी, चंब्बाणा होसमणी, मंजुनाथ इटगी, वैभव कुलकर्णी, संदीप पाटील, सुरेश चोपडे, सुनील नाईक,बाळू रामगाण्णा व अन्य दुकानदार उपस्थित होते.
खानापूर तालुक्यात रेशन सर्वरची मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत आहे. तसेच वारंवार विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येत आहे. त्यामुळे रेशन कार्डधारकांना अंगठा लावणे गैरसोयीचे होत आहे. त्यासाठी सर्वरच्या समस्येत सुधारणा करावी व २४ तास विद्युत पुरवठा करावा अशी मागणी यावेळी रेशन दुकानदार संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष महादेव दळवी यांनी तहसीलदारांच्या कडे केली.