
#नुतन नगराध्यक्ष सौ मिनाक्षी प्रकाश बैलुरकर यांचे कार्य!
#स्वच्छता कामगाराबरोबर ड्राइव्हर ,वाटर सप्लायर्सना नोकरीत कायम करा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात गेल्या कित्येक वर्षापासुन स्वच्छता कर्मचार्याचे पाऊल लागले नव्हते.
त्यामुळे विद्यानगरातील रस्त्याच्या दुतर्फा झाडाजुडपानी वाढल्या होत्या.
खुद्द् विद्यानगर प्रभागाचे नगरसेवक नगराध्यक्ष होते. त्याकाळात कधी स्वच्छता कामगाराकडुन स्वच्छतेची कामे झाली नाहीत.
मात्र नुकताच नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी माजी स्थायी कमिटी चेअरमन व विद्यमान नगरसेवक प्रकाश बैलुरकर याच्या पत्नी सौ मिनाक्षी प्रकाश बैलुरकर या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी विराजमान होताच. काही पंधरा दिवसात विद्यानगरात प्रत्यक्ष भेट देऊण या विद्यानगरात स्वच्छता कामगाराकडुन विद्यानगरातील रस्ता झाडाजुडपापासुन केरकचर्यापासुन मुक्त केला.गेल्या कित्येक वर्षापासुन याकडे कुणाचेच लक्ष नव्हते.
त्यामुळे नुकताच स्वच्छता कामगारानी याविद्यानगरातील रस्त्याची स्वच्छता केल्याने विद्यानगरातील नागरीकांतुन समाधान पसरले आहे.
नगरपंचायतीच्या स्वच्छता कामगाराना नोकरीत कायम मात्र ड्राइव्हर ,वाटर स्पलायरना का नाही!
खानापूर नगरपंचायतीच्या काही स्वच्छता कामगाराना नोकरीत कायम केले आहे.मात्र त्याच विभागात काम करणार्या ड्राइव्हर तसेच वाटर स्पलायरना नोकरीत कायम केले नाही. अशी खंत नगरपंचायतीच्या कामगारानी बोलुन दाखविली.