
#चीफआँफिसर संतोष कुरबेट घरोघरी जाऊन टॅक्स भरण्याची करता आहेत विनंती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहराची दिवसेंदिवस व्याप्ती वाढत चाललेली आहे. त्यामुळे खानापूर शहरासह उपनगराची संख्या वाढली. लोक संख्या ही वाढली त्यामुळे अनेक समस्या वाढल्या आहेत. खानापूर शहरातुन १०० टक्के टॅक्स सरकारला देऊ केला तर शहरातील अनेक समस्या दुर करता येतील. यासाठी खानापूर नगरपंचायतीचे चीफ आँफिसर संतोष कुरबेट खानापूर शहरात घरोघरी जाऊन कुटूंब प्रमुखाना घरचा टॅक्स भरण्याची विनंती केली.यावेळी नगराध्यक्षा सौ मिनाक्षी बैलुरकर ,उपनगराध्यक्षा जया भुतकी व सर्व नगरसेवकाचे सहकार्य लाभत आहे.
९० टक्के टॅक्स वसुल करण्यात यश!
खानापूर शहरात टॅक्स वसुलीसाठी नगरपंचायतीचे चीफ आँफिसर संतोष कुरबेट सह सर्वच नगरपंचायतीचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत.त्यामुळे खानापूर शहरातील टॅक्स वसुली ९० टक्के पार पडली आहे. परंतु १०० टक्के टॅक्स वसुली झाली तर खानापूर नगरपंचायतीला अनुदानातुन विकास साधता येईल तेव्हा खानापूर शहरातील नागरीकानी आपला टॅक्स वेळेत भरून नगरपंचायतीला सहकार्य करावे .असे आवाहन नगरपंचायतीकडुन करण्यात आले आहे.
शहरातील दुकानदारानी ,व्यवसायिकानी लायसन्स फी भरण्याचे आवाहन!
खानापूर शहरासह उपनगरातील दुकानदारानी अथवा व्यवसायिकानी आपली लायसन्स फी भरून नगरपंचायतीला सहकार्य करण्याचे आवाहन नगरपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.