
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
आपल्या जीवणात काही तरी साध्य करायचे असेल तर कष्ट,प्रामाणिकपणा व भक्ती असणे गरजेचे आहे. ऐवढेच नव्हेतर यशस्वि होण्यासाठी जिद्द व परिश्रम असणे गरजेचे आहे. असे मार्गदर्शन खानापूर सरकारी ए ग्रेड पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. दिलीप जवळकर यानी विद्यार्थ्याना केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समर्थ इंग्रजी स्कूलचे सचीव डाॅ. डी.नाडगौडा.उपस्थित होेते.व्यासपीठावर संस्थेचे संचालक डाॅ.एन एल कदम,डाॅ.पी.एन पाटील,
एफ.एम.पाटील, मल्लेशी गडदार,नागराज गडदाड,सातेरी पुन्नुचे आदी संचालक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. प्राचार्या सौ दिव्या नाडगौडा यानी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
इयत्ता दहावीच्या दीप लावुन आपल्या यशाची स्वाक्षरी दिली.कार्यक्रमाचे औचित्य साधुन इयता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यानी नृत्य सादर करून आपले प्रेम व्यक्त केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली.
शेवटी अध्यक्षिय भाषणात सचीव डाॅ.डी.ई.नाडगौडा म्हणाले की, दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्याच्या जीवनातील पहिली पायरी होय. या पायरीवर यशस्वी झाला तर जीवनात तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.यासाठी दहावीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवा.व जीवनात यशस्वि व्हा.असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाला विद्यार्थी ,शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार प्राचार्या सौ.दीव्या नाडगौडा यानी मानले.