खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील राशन दुकानदाराना कळविण्यात येते की मागील महिण्यातील
फेब्रूवारीचा ५ किलो तांदूळ व मार्च महिण्याचा १० किलो तांदूळ असा एकूण १५ किलो राशनचा तांदूळ या महिन्यात प्रत्येकाला मिळाला पाहीजे याची सर्व राशन दुकानदारांनी नोंद घ्यावी असे आवाहन पंचहमी योजनेचे अध्षक्ष सुर्यकांत कुलकर्णी व सर्व सदस्यांनी केले आहे.
तेव्हा खानापूर तालुक्यातील जनतेस कळविण्यात येते की मार्च महिण्यात तुम्हाला १५ किलो तांदूळ मिळणार आहे मागच्या महिन्याचा ५ किलो व या महिन्याचा १० किलो मिळून १५ किलो.
जर कोणी १५ किलो पेक्षा कमी तांदूळ देण्याचा प्रयत्न केला तर गॅरंटी योजनेचे अध्यक्ष, सदस्य यांचेशी संपर्क साधावा.
सध्या पंचहमी योजनेचे सदस्य सर्व राशन दुकानदारांस स्वता जाऊन सांगत आहेत पण जर यामधे कोणी चुक केल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे ही सुर्यकांत कुलकर्णी यांनी सांगितले आहे.
तरी सर्व राशन दुकानदारांना नम्र विनंती आहे प्रति माणशी १५ किलो तांदूळ जनतेस व्यवस्थित द्यावा.
🚩जय खानापूर 🚩