
#शिवस्मारक चौकात म ए समिती,भाजपच्यावतीने ,बहुजन आघाडी!
#खानापूर नगरपंचायत!
संदेश क्रांती न्यूझ :
खानापूर प्रतिनिधी
“रयतेच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे, रयतेच्या स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे लोककल्याणकारी शासनकर्ते अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत, बहुजनप्रतिपालक कुळवाडीभूषण, शस्त्रास्त्रपारंगत, न्यायनीतीधुरंदर, हिंदु धर्मरक्षक, हिंदवी स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्रिवार मानाचा !
खानापूर शहरातील विविध ठिकाणी शिवजयंती उत्सव बुधवारी दि १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडली.
यावेळी शिवस्मारक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विधीवत पुजा,अभिषेक करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
माजी आमदार दिगंबर पाटील ,सरचिटणीस आबासाहेब दळवी, समितीचे नेते प्रकाश चव्हाण ,बाळासाहेब शेलार,जगन्नथ बिरजे, प्रत्रकार विवेक गिरी, बी बी पाटील तसेच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी तालुका अध्यक्ष संजय कुबल, भाजप नेते उदय भोसले, प्रकाश निलजकर, बबन अल्लोळकर आदी उपस्थित होते.
त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतिने तालुका अध्याक्ष अनंत म मादार ,बेळगाव जिल्हा कार्याध्याक्ष
राजू कांबळे, पदाधिकारी हणमंत सोनटक्के, गणपती मादार दिनेश मदार सुजल मादार आदि उपस्थित होते.
खानापूर नगरपंचायतीच्यावतीने !
खानापूर शहरातील नगरपंचायतीच्यावतीने कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती उत्साहात पार पडली.
यावेळी नुतन नगराध्या सौ.मनिक्षा प्रकाश बैलुरकर यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजाच्या फोटोचे पुजन करण्यात आले.
यावेळी माजी स्थायी कमिटी अध्यक्ष विद्यामान नगरसेवक प्रकाश बैलुरकर,नारायण ओगले,विनोद पाटील,उपनगराध्यक्षा जय भुतकी, तसेच अधिकारी राजू जांबोटकर, सुहास गुरव ,श्री कांबळे,प्रेमानंद नाईक व इतर कर्मचारी उपस्थित होते.