
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
सालाबाद प्रमाणे यंदा ही खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष व पदाधिकांर्याची निवड नुकताच करण्यात आली.
यावेळी कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदी हणमंत गुरव (गणेबैल),उपाध्यक्षपदी रूद्राप्पा हंडोरी,तर सचिवपदी सदानंद होसुरकर,कार्याध्यपदी राजाराम गुरव,खजिनदार पदी लक्ष्मण झांजरे यांची एकमताने निवड करण्यात आली.
खानापूर शहरातील कवळेमठात माजी अध्यक्ष लक्ष्मण बामणे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच पार पाडली.
बैठकीत पदाधिकार्याची सर्वानुमते निवड करण्यात आली.त्याचबरोबर यंदाच्या कुस्ती आखाड्याबाबत चर्चा करण्यात आली.
प्रारंभी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.त्यानंतर अहवाल तसेच हिशोब सादर करण्यात आला.
यावेळी यंदाचा कुस्ती आखाडा भरविण्याविषयी व इतर बाबीबाबत चर्चा करण्यात आली .
यावेळी बैठकीला नुतन अध्यक्ष हणमंत गुरव (गणबैल) ,रूद्राप्पा़ हंडोरी,सदानंद होसुरकर,राजाराम गुरव,लक्ष्मण झांजरे,पांडुरंग पाटील,अर्जून देसाई,शंकर पाटील,यशवंत अल्लोळकर,जयवंत खानापूरकर,रामंचंद्र पाटील,प्रकाश मजगावी,मधुकर पाटील,लक्ष्मण चाळगुंडे,नागाप्पा उचवडे आदीसह कुस्ती संघटनेचे सदस्य ,ग्रामस्थ उपस्थित होते.