
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपकडे पाहिले जाते.मात्र तालुक्यात कोणतीच कामे सत्ताधारी पक्षा कडुन होताना दिसत नाही.
मात्र काॅग्रेस पक्षाने खानापूर तालुक्यात काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी व त्याच्या पदाधिकार्यानी व सहकार्यानी अनेक समस्यांबाबत पुढाकार घेतल्याने तालुक्यातील जनमानसात काॅग्रेस बद्दलचे जनमत चांगेलच प्रभावि पडले आहे.
नुकताच पंचहमी योजनेचे अध्यक्ष सुर्यकांत कुलकर्णी यानी पुढाकार घेऊन तालुक्यातील प्रत्येक रेशनदुकानी १५ किलो तादुळाचे वितरण चोख करावे.अशी सुचना केली. त्यामुळे तालुक्यातील जनतेला दिलासा मिळाला.
याजबरोबर काॅग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यानी प्रत्येक नागरीकांच्या समस्यां सोडविण्याकडे कटाक्षाने लक्ष दिले आहे.
तालुक्यातील कार्यालयीन कामकाजात दुर्लक्ष केलेल्या अधिकार्यावर माजी आमदार डाॅ.अंजली निंबाळकर अंकूश ठेवून आहेत.त्यामुळेच अनेक अधिकारी निलंबित झाले आहेत.
त्यामुळेच खानापूर तालुक्यात काॅग्रेस पक्षाच्या तुलनेत सत्ताधारी पक्ष भाजपकडुन काणतेच कार्य होताना दिसत नाही. नुकताच भाजपकडुन एमएलसी सी टी रवी यांचा सत्कार सोहळा वगळता तालुक्यात कोणतेच लोकोपयोगी कार्यक्रम पार पडला नाही.
याशिवाय तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी व भूलवाद कमिटी सदस्य विनायक मुतगेकर यानी बेंगलुुर येथे वनमंत्री ईश्वर खांडरे याची भेट खानापूर तालुक्याच्या जंगल भागातील अनेक समस्यांंना वाचा फोडली.वनमंत्र्याना जाणीव करून दिल्या त्यामुळे समस्यांचे निवारण होणार असे आश्वासन मिळाल्याने तालुक्यायातील जनेतुन समाधान पसरले आहे.
त्यामुळे खानापूर तालुक्यात आजच्या घडीला काॅग्रेस पक्षाचे कार्य जनतेला दिसुन येत आहे.