
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर शहरातील दि खानापूर तालुका प्राथमिक शाळा शिक्षक को.आँप. सोसायटीच्या नुतन चेअरमन पदी आय.जे.बेपारी यांची दुसर्यांदा निवड करण्यात आली.
त्याच्या सन २०१६ साली पहिल्या चेअरमन पदाच्या काळात सोसायटीची इमारत उभारण्यात आली.आज खानापूर तालुका प्राथिक शाळा शिक्षक को.आँप.सोसायटी स्वताच्या इमारतीत कार्यरत आहे. याचा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकाना अभिमान वाटतो.
त्यांची पुन्हा सन २०२४ -२५ साली पुन्हा दि खानापूर तालुका प्राथमिक शाळा शिक्षक को-आँप. सोसायटीच्या चेअरमन पदी निवड करण्यात आली.
यावेळी दि.खानापूर प्राथमिक शाळा शिक्षक को.आँप सोसायटीचे संचालक एस एल हळदनकर,एन.एल.शिवनगेकर, महेश कुंभार,बी.बी.मेदार,बी.बी चापगावकर,के.एच.कौंदलकर,एल व्ही गुरव,प्रकाश मादार ,शिवा पाटील, श्री सोनारवाडकर, जे पी पाटील,
,वाय.एम.पाटील, संचालिका सौ .जे.ए.मुरगोड, श्रीमती मीरा पाटील आदी संचालक असुन संचालकाच्या उपस्थितीत नुतन चेअरमन पदी आय.जे.बेपारी याची निवड करण्यात आली.
नुतन चेअरमन पदी आय.जे.बेपारी यांची दुसर्यादा निवड झाल्यामुळे खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळा शिक्षकातुन तसेच तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.