
#जिल्हा माध्यान्ह आहार अधिकारी लक्ष्मणराव यकुंडीची केंद्राना भेट!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात सोमवारी दि २४ रोजी झालेल्या दहावीच्या परीक्षेत गणित पेपरला ४५ विद्यार्थ्यांनी दांडी मारली.
दहावीच्या परीक्षेत गणित पेपर सर्वात महत्वाचा पेपर मानला जातो.त्यामुळे गणित विषयाच्या पेपर दिवशी स्काॅड अवर्जून भेटी देतात.
सोमवारच्या गणित पेपरला खानापूर तालुक्यातील दहावीच्या ११ परीक्षा केंद्रावरील ३६७२ विद्यार्थ्यापैकी ३६२७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ४५ विद्यार्थ्यानी दांडी मारली होती.
सोमवारी दि. २४ रोजी गणित विषयाच्या पेपरला बेळगांव जिल्हा माध्यान्ह आहार अधिकारी लक्ष्मणराव यकुंडी तसेच श्री भंडारी यानी खानापूर शहरातील ताराराणी हायस्कूल ,मराठा मंडळ हायस्कूल,सर्वोदय इंग्लिश मिडीयम स्कूल तसेच नंदगड,जांबोटी आदी दहावी परीक्षा केंद्रावर भेटी देऊन पाहणी केली.
तालुक्यात आजचा गणित पेपर सुरळीत पार पडला.