
#नगरसेवक लक्ष्मण मादार यांची मागणी!
#नगरपंचायतीची बैठक!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील शाहु नगर वसाहतीतील नागरीकांना मुख्य म्हणजे स्मशान भुमी नाही आहे. तेव्हा नगरपंचायतीने शाहुनगरातील नागरीकाना स्मशानभुमी साठी जागा मंजुर करून स्मशानभुमीची सोय करावी. तसेच शौचालयाची व्यवस्था करावी.अशी मागणी नगरसेवक लक्ष्मण मादार यानी बुधवारी दि २६ रोजी नगरपंचायतीच्या सभागृहात नगर सेवकांच्या आयोजीत बैठकीत केली.
यावेळी नगराध्यक्षा सौ.मिनाक्षा प्रकाश बैलुरकर अध्यक्षस्थानी होत्या.
प्रास्ताविक प्रेमानंद नाईक यानी केले. तर चीफ आँफिसर संतोष कुरबेट उपस्थित नगरसेवकांचे स्वागत केले.
यावेळी नगरसेवक लक्ष्मण मादार म्हणाले की सरकारने मागास वर्गीयासाठी अनेक सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र शाहुनगरातील मागास वर्गीयासाठी स्मशान भूमी नाही.
एवढेच नव्हेतर या समाजाला शौचालयाची मोठी समस्या आहे. सार्वजनिक शौचालय असुन सुध्दा पाण्याची सोय नसल्याने कुच्छ कामी ठरलेली आहेत. त्यामुळे स्त्रीयाना उघड्यावर शौचालयाला जाणे मोठे कठीण झाले आहे. शाहुनगरात जवळपास ७०० ते ८०० लोकवस्ती आहे.प्रत्येकाच्याच घरी शौचालयाची सोय नाही.कारण मोजक्याच जागेत घरे दिली आहेत.
शाहुनगरातील वस्तीत १४ एकर जमिनीचा वाद अद्याप सुटला नाही. पूर्वी फॅक्टरीच्या मालकाला लिज वर देण्यात आलेल्या जागेवरून दोन गटात वाद सुरू आहे. त्यामुळे स्मशान जागेचा प्रश्न उभारला आहे. तेव्हा नगरपंचायतीने शाहुनगरातील नागरीकाना स्मशान भूमी व शौचालयाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी होताच नगरसेवकातुन क्षुल्लक गोष्टीवरून वाद निर्माण झाला. व काही काळ नगरसेवकांची बैठक तहकूब होऊण नंतर त्या विषयावर तोडगा काढुन बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
आजच्या नगरसेवकाच्या बैठकीत वाढत्या कुत्र्यांचा उपद्रव तसेच माकडाचा होणारा त्रास याविषयावर चर्चा करण्याच आली.
यावेळी खानापूर नगरपंचायतीचा बेजट ही बैठक मांडण्यात आला.
बैठकीत नगरसेवक प्रकाश बैलुरकर, नारायण मयेकर,नारायण ओगले,तोहिद चादखण्णावर,रफिक वारेमणी, मजहर खानापूरी आदीनी विविध समस्यावर चर्चा केली .बैठकीला कर्मचारी वर्ग उपस्थित होता.