
#मान्यवरांचा सत्कार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर लायन्स क्लबला जिल्हा गव्हर्णर मनोज मानके यांची भेट बुधवारी दि.२६ रोजी येथील शिवाजीनगरातील समुदाय भवनात पार पडली.
प्रारंभी लायन अजित पाटील यानी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी कार्यक्रमाचे औचित्य साधुन ओलमणी प्राथमिक मराठी शाळेला ग्रीन बोर्ड देण्यात आले.क्लबमध्ये नविन मेंबर झालेल्या डाॅ .बिरादार, व राजटेक इंजिनिअरींगचे मालक राजू पी आनंदाचे याना शपथ विधी दोऊ केली.
#सत्कार सोहळा!
खानापूरातील शिवस्मारकाचे कर्मचारी महम्मद बेलगामी यानी गेली ३० वर्षे प्रामाणिकपणे शिवस्मारकाची सेवा केली.त्याबदल त्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच शिवाजीनगर येथील राहुल पाटील यांचा ही गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हा गव्हर्णर मनोज मानके यांनी वर्षभराचा आढावा घेऊन नवनविन उपक्रम राबविण्याबद्दल मार्गदर्शन केले.
जांबोटी येथील अपंग कल्याण संस्थेला भेट देऊण सहकार्य करण्याचे सुचित केले.तसेच लायन संभाजी पाटील यांनी जांबोटी अपंग कल्याण संस्थेला ५००० रूपयांची देणगी देऊ केली. तसेच मदन देशपांडे यानी अपंग कल्याण संस्थेला मदत केली.
ओलमणी प्राथमिक मराठी शाळेच्या मुलाना टूथ पेस्ट,ब्रश ,जाॅमेट्री बाॅक्स ,आदी वस्तू खानापूर लायन्स क्लब कडुन देण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला खानापूर लायन्स क्लबचे अध्यक्ष रविसागर उप्पीन ,सेक्रेटरी बी एम हम्मणावर,विनय हिरेमठ,डाँ.राधाकष्ण हेरवाडेकर,लायन अजित पाटील,भाऊराव चव्हाण ,एम बी बेनकट्टी,महेश पाटील,संभाजी पाटील,प्रकाश बेतगावडा,सी बी होसमनी,विकास कल्याणी ,के एम घाडी,सतीश पाटील,ज्यूनेद तोपिनकट्टी,ब्रह्मानंद कोचेरी, डाॅ.वागळे , नमिता उप्पीन ,श्रध्दा हेरवाडेकर,जयश्री हम्मणावर व इतर लायन क्लबचे पदाधिकारी ,समाजसेवक, इतर मान्यवर उपस्थित होते.