
#नगराध्यक्षा सौ.मिनाक्षी बैलूरकर याचा सवाल!
संदेश क्रांंती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर नगरपंचायतीची बैठक बुधवारी दि.२६ रोजी नगरपंचायतीच्या सभागृहात पार पडली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. मिनाक्षी प्रकाश बैलुरकर होते. यावेळी चीफ आँफिसर संतोष कुरबेटसह नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बैठकीत विषयावर चर्चा होऊन नगरपंचायतीचा अर्थसंकल्प चीफ आँफिसर संतोष कुरबेट यानी नगराध्यक्षा सौ .मिनाक्षी बैलुरकर यांच्याकडे सपूर्त करताच. नगराध्यक्ष सौ.मिनाक्षी बैलुरकर यानी अर्थसंकल्पाबाबत नगराध्यक्षाना व नगरसेवकाना विश्वासात का घेतला नाही. नगराध्य व नगरसेवक याना काहीच किमत नाही का? तसे असेल तर नगरपंचायतीचा कारभार तुम्हीच चालवा आम्ही घरी जातो.असे खडेबोल त्यानी सुनवले .
यावेळी सारवा सारव करून बैठकीला पुन्हा सुरूवात केली.
यावेळी सन २०२४ -२५ सालातील आर्थिक वर्षात कर, सरकारी अनुदान , व विविध माध्यमातुन नगरपंचायतीला १० कोटी ४९ लाख रूपये जमा तर स्वच्छता पाणी पुरवठा व विविध विकासावर १० कोटी ३९ लाख रूपये खर्चाचे अंदाज सादर करण्यात आले.
यावेळी बैठकीत राज्य सरकारच्या नियमा नुसार ५ ते १० टक्के कर वाढ करणे अनिवार्य आहे.
यावेळी नगरसेवक नारायण मयेकर यानी शहरवासीयाना कराचा भुर्दंड बसू नये .यासाठी नाममात्र तीन टक्के करावी.अशी सुचना केली. यावेळी नगराध्यक्षा सौ मिनाक्षी बैलुरकर यानी सहमती दर्शविली .
यावेळी बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. बैठकीला उपनगराध्यक्षा जया भुतकी,नगरसेवक लक्ष्मण मादार,नारायण मयेकर,प्रकाश बैलुरकर,नारायण ओगले,मजहर खानापूरी ,रफिक वारेमनी ,आप्पया कोडोळी,नगरसेविका मेघा कुंदरगी, शोभा गावडे,राजश्री तोपिनकट्टी,फातिमा बेपारी,लक्ष्मी अंकलगी आदी उपस्थित होते. आभार विनोद संनदी यानी मानले.