
#चेअरमन पदी अमृत महादेव शेलार!
#व्हा.चेअरमन पदी मेघशाम घाडी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर शहरातील सर्वात जुनी अर्बन बॅक म्हणून ओळखल्या जाणार्या सध्याची खानापूर को.आँप.बॅकेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड बिनविरोध निवड गुरूवारी दि. २० रोजी बॅकेच्या सभागृहात पार पडली.
दि.१२ जानेवारी रोजी चुरशीत पार पडलेल्या खानापूर को आँप.बॅकेच्या निवडणुकीत विकास पॅनलवर सहकार पॅनेलचा एकतर्फि विजय झाला.
त्यानंतर चेअरमन ,व्हा.चेअरमन निवड गुरूवारी पार पडली.
प्रारंभी जेष्ठ संचालक परशराम गुरव यानी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन केले.यावेळी मॅनेजर नंदकुमार निट्टूरकर यानी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी निवडणुक अधिकारी म्हणून नविन हुळकुंडे व रांघवेंद्र पाटील उपस्थित होते.
यावेळी चेअरमन व व्हा.चेअरमन पदाची निवड बिनविरोध करण्याचा निर्णय संचालकातुन झाला.
चेअरमन पदासाठी अमृत महादेव शेलार यांची तर व्हा.चेअरमन पदासाठी मेघशाम जोतिबा घाडी यांची निवड निवडणुक अधिकार्यानी घोषित केली.
यावेळी बॅकेचे जेष्ठ संचालक परशराम रा.गुरव, डाॅ.सी जी पाटील, विठ्ठल निं.गुरव, रमेश श.नार्वेकर,विजय देवाप्पा गुरव,मारूती बाबूराव पाटील,मारूती अप्पूसिंग बिलावर,
अनिल बुरूड,संचालिका अंजली कोडोळी,अंजुबाई गुरव आदी संचालक उपस्थित होते.
चेअरमन व व्हा.चेअरमन पदाची निवड होताच बॅकेच्या कर्मचार्याच्यावतीने सत्कार करण्यात आला.
याविविध संघ संस्थाच्यावतीने तसेच ग्राम पंचायत सदस्य संघटनेच्या वतीने अध्यक्ष विनायक मुतगेकर ,उदय भोसले ,पत्रकारांच्यावतीने विवेक गिरी ,प्रकाश देशपांडे तसेच विविध मान्यवरा़नी नुतन चेअरमन अमृत शेलार व व्हा.चेअरमन मेघशाम घाडी यांचा पुष्पहार घालुन सत्कार केला.शुभेच्छा देऊ केल्या.
यावेळी संचालक रमेश नार्वेकर,जॅकी फर्नाडीस, जगन्नाथ बिरजे, मल्लापा पाटील,पत्रकार प्रकाश देशपांडे, विवेक गिरी, आदीनी विचार मांडले.
यावेळी सत्काराल उत्तर देताना नुतन चेरमन अमृत शेलार म्हणाले गेल्या तीन चार वर्षात बॅकेच्या प्रगतीत भरभराट आणली. तशीच भरभराट पुन्हा येत्या काळात आणुन ग्राहकाचा विश्वास प्राप्त करू.संस्थेचा कारभार पारदर्शक ठेवून सर्वाच्या विश्वासाला पात्र राहुन चेअरमन पदाची धुरा पार पाडू असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी बॅकेच्या १०० कोटी रूपयाच्या ठेवीचा नक्कीच विचार करून येत्या शतकमहोत्सवी पूर्वी १०० कोटी रूपयाच्या ठेवीचा ठप्पा गाठू असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार वासुदेव चौगुले यानी केले. आभार जेष्ठ संचालक रमेश नार्वेकर यानी मानले.