
#हजारो भाविकानी घेतला महाप्रसादाचा लाभ !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सालाबाद प्रमाणे यंदाही नवीन वर्षारंभी गुढीपाढवाच्या शुभमुहूर्ता श्री स्वामी समर्थाच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधुन रविवारी दि.३० रोजी सायंकाळी ४ वाजता स्वामीची पालखी मिरवणुक सोहळा पार पडला.
यावेळी स्वामी समर्थ पालखीची सुरूवात स्वामी केंद्रापासुन सुरू होऊन भक्तीभावाने स्वामीची पालखी घोडे गल्ली ,निंगापूर गल्ली ,राजा शिवछत्रपती चौक ,स्टेशन रोड,चिरमुरकर गल्ली,कडोलकर गल्ली,केंचापूर गल्ली,बाजारपेठ,घाडी गल्ली,गुरव गल्ली,बेंद्रे खूट, विठ्ठोबा गल्ली अर्बन बॅक चौक ,देशपांडे गल्ली यामार्गाने फिरून स्वामी समर्थ केंद्रात सांगता झाली.
सोमवारी महाप्रसादाचे आयोजन!
सोमवारी दि .३१ मार्च रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा करण्यात आला.
सोमवारी पहाटे ६ .३० वाजता स्वामीचे षोडशोचार पुजन, त्यानंतर सकाळी ८ वाजता भुपाळी आरती, व सकाळी १०.३० वाजता महानैवेद्य आरती, तर सकाळी १०.४५ वाजता श्री स्वामी याग त्यानंतर १२.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
खानापूर शहरासह तालुक्यातील विविध गावातुन हजारो स्वामी समर्थाच्या प्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अबाल पासुन वृध्दापर्यत मोठ्या संख्येने भाविकानी उपस्थिती दर्शविली होती.