
# रेल्वेस्टेशनरोड समुदाय भवनात कार्यक्रम!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
हरितक्रांती हरिकर डाॅ. बाबू जगजीवनराम यांच्या ११८ व्या जयंती दिनाचा कार्यक्रम शनिवारी दि.५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता खानापूर स्टेशनरोड वरील नगरपंचायतीच्या समुदाय भवनात आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विठ्ठल हलगेकर राहणार आहेत.
यावेळी खासदार ,विधान परीषद सदस्य तसेच तहसीलदार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी कार्यक्रमाला खानापूर तालुक्यातील अनुसुचित जाती -जमाती व इतर विविध संघटनेचे पदाधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते, तालुका अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत .
तरी डाँ बाबू जगजीवनराम जयंती तालुक्यातील जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.