
# एकूण ११ दहावी परीक्षा केंद्रे!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
सन २०२४-२५ सालातील खानापूर तालुक्यातील दहावीच्या ११ परीक्षा केंद्रावर शुक्रवारी दि ४ रोजी तृतीय भाषेच्या पेपरला ४२ विद्यार्थ्यानी दांडी मारली.
आजच्या तृतीय भाषेचा पेपर मराठी माध्यमसाठी इंग्रजी होता. तर कन्नड व इंग्रजी माध्यमसाठी हिन्दी विषयाचा पेपर होता.
खानापूर तालुक्यात दहावीच्या परीेक्षेसाठी ३६०५ विद्यार्थ्याची नोंद होती .त्यापैकी ३५६३ विद्यार्थ्यानी हजेरी लावली तर ४२ विद्यार्थ्यानी परीक्षेला दांडी मारली.
खानापूर तालुक्यात आजचा दहावीचा तृतीय भाषेचा पेपर शांततेत पार पडला.
कुठेही गैरप्रकार घडला नाही.यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.
दहावी परीक्षा पेपरला नोडल अधिकारी म्हणून भारती लोकापूर यानी काम पाहिले.