
#विद्यार्थ्याना लॅपटाँपचे वितरण!
#विक्रेत्याना छत्रीचे वाटप!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर नगरपंचायतीत बाबू जगजीवनराम जयंतीचे औचित्य साधुन सन २०२४-२५ सालातील एस एफ सी अनुदानाच्या ७ .२५ टक्केवारीच्या योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्याना छत्र्याचे वाटप तसेच नगरोत्थान योजनेच्या ७.२५ टक्के अनुदानातुन बी.ई व इतर पदवीधर विद्यार्थ्याना लॅपटाॅपचे वाटप शनिवारी करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ मिनाक्षी बैलूरकर उपस्थित होत्या.वितरक म्हणून आमदार विठ्ठल हलगेकर होते.
तर व्यासपिठावर उपाध्यक्षा जया भुतकी नगरसेवक प्रकाश बैलुरकर,लक्ष्मण मादार,आपय्या कोडोळी,रफिक वारेमणी,विनोद पाटील,नगरसेविका मेघा कुंदरगी,लता पाटील ,राजश्री तोपिनकट्टी,लक्ष्मी अंकलगी,सायरा सनदी आदी उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक शोभा पत्तार यानी केले.
तर चीफ आँफिसर संतोष कुरबेट यानी पुष्पगुच्च्छ देऊण सर्वांचे स्वागत केले.
यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर व उपस्थितांच्याहस्ते रोपाला पाणी देऊन कार्यक्रमाचे उदघाटन केले.
यावेळी ९९ विक्रेत्याना छ्त्र्या, इंजिनिअर पदवीधर विद्यार्थ्याना लॅपटॅप व वस्तीगृहातील शालेय विद्यार्थीनीना मच्छरदाणीचे वितरण तसेच नगरपंचायतीच्या कर्मचार्याना कामगारदिना निमित आयोजित स्पर्धेतील विजेत्याना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यानी लाभार्थी विद्यार्थ्याना उद्देशुन बोलताना म्हणाले की सरकारने दिलेल्या लॅपटाॅपचा उपयोग अभ्यासासाठी करा. व यशस्वी व्हा. असा सल्ला दिला.
यावेळी नगरपंचायतीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजश्री वर्णेकर यानी केले.तर आभार प्रेमानंद नाईक यानी मानले.