
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील रेशन वाटपात प्रचंड मोठा घोटाळा उघडकीस आला असून, गोर गरीब सामान्य जनतेच्या डोक्यावरील लोणी खाण्याचे महापाप या रेशन वाल्यांकडून घडत असल्याचे पंचहमी योजनेचे अध्यक्ष सुर्यकांत कुलकर्णी यांनी शनिवारी दि ५ रोजी खानापूर येथील विश्राम धामात बोलविलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की,तालुक्यात सरकारकडून रेशण वाटप योजना ही गोरगरीब लोकासाठी मदत व्हावी म्हणून योजना असताना तालुका अन्न पुरवठा खाते व नंदगड मार्केटीग सोसायटीकडुन कमी धान्याचा पुरवठा केला आहे. परंतु नागरीकांना मात्र कमी रेशन मिळत असुन यासाठी गेल्या महिण्या भरापासुन तपास केला असता तालुका अन्न पुरवठा खाते तसेच नंदगड मार्केटींग सोसायटीकडुन एक क्विंटल ते दीड क्विंटल रेशनचा तांदुळ कमी प्रमाणात पुरवठा केला जातो. तर हा तादुळ साठा जातो कुठे याची चौकशी झालीच पाहिजे.व कमी पडलेला तादुळ वसुल केल्या शिवाय खानापूर तालुका ब्लाॅक क्राॅग्रेस व रेशन वाटप समिती गप्प बसणार नाही. असा इशारा ही दिला.
तसेच खानापूर तालुका ब्लाॅक काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी म्हणाले की जिल्हा अन्नपुरवठा अधिकारी श्री नाईक व तालुका अन्न पुरवठा अधिकारी नदाफ यांच्या दबावामुळे रेशन पुरवठ्यात गोंधळ होत असल्याची माहिती आमच्यापर्यत आली आहे.त्याविरोधात अन्न पुरवठामंत्र्याकडे तक्रार करण्यात करणार असल्याचे सांगीतले.यावेळी ते म्हणाले की यासाठी माजी आमदार व एआयसीसी सचिव डाॅ. अंजली निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर तालुक्याच्या कोणत्याही सरकारी कार्यालयात गोंधळ ,गैरव्यवहार झाल्यास तालुका ब्लाॅक काॅग्रेस त्याचा पाठपुरवठा करून लागलीच कारवाईसाठी प्रयत्न केला आहे.
रेशन पुरवठा सुरळीत होत आहे.म्हणुन नंदगड मार्केटीग सोसायटीमध्ये बैठका घेऊण सह्या घेतल्या जात असल्याची माहिती आमच्या पर्यत पोहचली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कॉंग्रेस सरकार गोर गरीब सामान्य जनतेसाठी ५२००० कोटी रूपयाच्या गॅरंटी योजना राबवित असून त्यामधे जर कोणी भ्रष्टाचार करत असेल सामान्य जनतेला फसवित असेल तर खानापूर ब्लॉक कॉंग्रेस गप्प बसणार नाही असे सांगितले आहे.
पत्रकार परीषदेला तालुका ब्लाॅक अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी, तालुका पंचहमी योजना अध्यक्ष सुर्यकांत कुलकर्णी शहर अध्यक्ष महांतेश राऊत,काॅग्रेस नेते सुरेश जाधव, महिला अध्यक्षा सौ सावित्री मादार, भूलवाद कमिटी सदस्य विनायक मुतगेकर, नगरसेवक लक्ष्मण मादार, ईश्वर बोबाटे ,इसाक पठाण आदी काॅग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.