
संदेश क्रा़ती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सालाबाद प्रमाणे यंदाही सोमवारी दि. १४ रोजी सकाळी ९ वाजता खानापूर जुने तहसील कार्यालयापासुन भारतरत्न राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याहस्ते प्रतिमेचे पुजन होऊन मिरवणूकीला सुरूवात होणार आहे.
ही मिरवणुक शहरातील प्रमुख मार्गावरून निघणार आहे.त्यानंतर पणजी बेळगांव महामार्गावरील खानापूर शहरातील बाबासाहेब आंबेडकर गार्डनमध्ये दुपारी १२ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला खानापूर तालुक्यातील अनुसुचित जाती व अनुसुचित प्रवर्गातील तालुका स्तरावरील विविध भागातील नेते, पदाधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते तालुका अधिकारी व कर्मचारी विविध संघ संघटनेचे पदाधिकारी व नागरीकानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.