
#मान्यवराच्या हस्ते वितरण!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
सालाबाद प्रमाणे यंदा ही खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेच्यावतीने लवकरच जंगी कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
यानिमित्त यंदा ही कुस्ती आखाड्यासाठी आठ ते साडे आठ लाख रूपयाचे बजेट लागणार आहे. यासाठी खानापूर कुस्तीगीर संघटनेच्यावतीने आयोजित देणगी पुस्तकाचे वितरण मंगळवारी दि १५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले .अशी माहिती खानापूर कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष निवृत सुभेदार हणमंत गुरव (गणेबैल) यानी अध्यक्षीय भाषणात बोलताना दिली.
प्रारंभी सदस्य प्रकाश मजगावी यानी प्रास्ताविक करून कुस्ती आखाड्याचा आहवाल सादर केला.
यावेळी व्यासपीठावर माजी आम.अरविंद पाटील ,शिवसेनेचे राज्य उपाध्यक्ष के पी पाटील ,उद्योजक भूषण काकतकर, माजी भाजपा ताुलका अध्यक्ष संजय कुंबल, अध्यक्ष, एम डी सदानंद पाटील ,येळ्ळूर महाराष्ट्र कुस्ती आखाड्याचे अध्यक्ष प्रदिप देसाई, चांगाप्पा निलजकर,व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरानी कुस्ती आखाडा पार पाडण्याबदल विचार व्यक्त केले.
यावेळी उपाध्यक्ष रूद्राप्पा हंडोरी, सचिवपदी सदानंद होसुरकर,कार्याध्यक्ष राजाराम गुरव,खजिनदार लक्ष्मण झांजरे तसेच सदस्य पांडुरंग पाटील,अर्जून देसाई,शंकर पाटील,यशवंत अल्लोळकर,जयवंत खानापूरकर,रामंचंद्र पाटील,प्रकाश मजगावी,मधुकर पाटील,लक्ष्मण चाळगुंडे,नागाप्पा उचवडे आदीसह कुस्ती संघटनेचे सदस्य ,कुस्तीशौकीन ,माजी पैलवान उपस्थित होते.
आभार मल्लापा मारीहाळ यानी मानले.