
#लोकमान्य एज्यूकेशन सोसायटीचा उपक्रम!
#पाच कोर्सना परवानगी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका हा शैक्षणिक दृष्ट्या अति मागासलेला तालुका असुन तांत्रिक शिक्षणासाठी खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्याना बेळगाव अथवा बेंगलुरसह बाहेर शहरात जावे लागते.
याची जीणाव ठेवून बेळगाव येथील लोकमान्य एज्यूकेशन सोसायटीच्या पुढाकाराने खानापूरात विठ्ठलराव यशवंतराव चव्हाण पाॅलिटेक्नीक काॅलेजची सुरूवात सन २०२५-२६ साला पासुन होत असुन ५ कोर्सना परवानगी मिळाली आहे.तेव्हा दहावी पास विद्यार्थ्यानी खानापूरातील लोकमान्य भवनात नव्याने सुरू होणार्या व्ही.वाय.चव्हाण पाॅलिटेक्निक काॅलेजला प्रवेश घ्यावा.असे आवाहन व्ही.वाय.चव्हाण पाॅलिटेक्निक काॅलेजचे समन्वय अधिकारी डाॅ.डी.एन.मिसाळे यानी लोकमान्य भवनात बोलविलेल्या पत्रकार परिषेदत माहिती दिली.
प्रारंभी लोकमान्य एज्यूकेशन सोसायटीचे सचिव सत्यव्रत नाईक यांनी प्रास्ताविक केले.
तर व्हाईस चेअरमन पंढरी परब यांनी उपस्थिताचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
यावेळी बोलताना समन्वय अधिकारी डाॅ.डी.एन.मिसाळे म्हणाले की, लोकमान्य संस्थेची सुरूवात १९९५ साली झाली. सहकार क्षेत्रात मोठी प्रगती करत मोठे नाव कमविले.
संस्थापक डाॅ.किरण ठाकूर यानी शैक्षणिक क्षेत्रात प्रगती साधली असुन खानापूर तालुक्याकडे त्यानी आपले लक्ष वेधले.खानापूरात वागळे पी यू काॅलेज व जांबोटी येथे पी.यू काॅलेज स्थापन शिक्षणाची गंगा सुरू केली.
ऐवढ्यावरच न थांबता त्याना खानापूरात तांत्रिक शिक्षणाचा विचार करून व्ही.वाय.चव्हाण पाॅलिटेक्निक काॅलेजची उभारणी केली.
खानापूरात पाॅलिटेक्निक काॅलेजमध्ये पाच कोर्सना परवानगी!
यामध्ये दहावी पास विद्यार्थ्यासाठी काॅम्प्यूटर सायन्स ६० विद्यार्थ्यासाठी व फी ४० हजार रूपये, इलेक्ट्रीकल अँड कम्यूनिकेशन ६० विद्यार्थ्यासाठी, व फी ४० हजार रूपये, तर आरटीफिशल इंजिनिअरींग (ए.टी.& एम\सी लर्निंग) ३० विद्यार्थ्यासाठी ३० हजार रूपये,मेकाट्राॅनिक्स ३० विद्यार्थ्यासाठी ३० हजार रूपये व इलेट्रीक्लस, & इलेट्राॅनिक्स ३० विद्यार्थ्यासाठी ३० हजार रूपये दोन सेमिस्टरसाठी फी असणार आहे.
तेव्हा दहावी पास नंतर पी.यू. सी ,पदवीधर विद्यार्थ्याना ही प्रवेश देण्यात येईल अशी माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी वागळे काॅलेजच्या प्राचार्या सौ.शरयू कदम ही उपस्थित होत्या.