
#हेस्काॅम कार्यकारी अभियंते जगदिश मोहिते यानी दिले आश्वासन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात वीज खात्याच्या नेहमीच तक्रारी असतात. याबाबत शनिवारी दि.१९ रोजी हेस्काॅम कार्यालयात ग्राहक मेळावा पार पडला.
या ग्राहक मेळाव्यात नागरीकानी समस्यांचा बडिमार केला.
देवलती (ता.खानापूर) येथील शेतकरी विठ्ठल निडगलकर यानी शेतातील टी.सी ओव्हर लोड होऊन व्यत्यय येत आहे.तेव्हा टी सी ची कॅपॅसीटी वाढवुन द्यावी.अशी मागणी केली.सुनिल अवरोळी या शेतकर्याने टी सी नादुरूस्त होऊन पाण्याची समस्या निर्माण होत आहे.तेव्हा टी.सी. दुरूस्त करून द्यावी.
अशी मागणी केली.
तर कु्प्पटगिरी (ता.खानापूर ) येथील शेतकरी भूषण पाटील यानी आपल्या शेतातील विधुत खांब बदलुन देण्याची मागणी केली.
तसेच देवलतीचे शेतकरी बसवाणी कानसीटी यानी टी सी वाढवुन देण्याची मागणी केली.
यावेळी तालुक्यातील अनेक शेतकर्यानी आपल्या समस्यांचा बडीमार केला.
यावेळी हेस्काॅमचे कार्यकारी अभियंते जगदिश मोहिते यानी शेतकर्याशी समस्यांबाबत चर्चा करून समस्या लागलीच सोडवुन देऊ. असे आश्वासन दिले.
यावेळी हेस्काॅमचे अधिकारी श्री रंगनाथ, श्री जावेद,भरतेश नागनुर व इतर कर्मचारी उपस्थित होते.