
#शिवस्मारक ट्रस्टची मागणी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या शिवस्मारक चौकातील शिवस्मारक इमारतीला तालुका पंचायतीच्या जुन्या कोर्ट आवारातील भल्या मोठ्या झाडामुळे इमारतीला तडे गेेलेत त्यामुळे शिवस्मारक इमारत केव्हा ही कोसळण्याच्या मार्गावर आहे.त्यामुळे ५ कोटीची इमारत उदवस्त होणाची भिती वाटत आहे. तेव्हा संबधीत खात्याच्या अधिकार्याना सुचना देऊन झाडाचा बंदोबस्त करावा.अशी मागणी शिवस्मारक ट्रस्टच्यावतीने आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यानी संबधित खात्याच्या तालुका पंचायतीचे प्रभारी कार्यनिर्वाहक अधिकारी रमेश मेत्री याना बोलावून समस्या पटवून दिली.
लागलीच तालुका पंचायतीच्या कार्ट आवारातील झाडाचा बंदोबस्त करा.अशी सुचना केली.तसेच कोर्ट आवारातील गाळ्याचा ही विचार करावा.अशी मागणी शिवस्मारक ट्रस्ट संचालक माजी आमदार दिगंबर पाटील,प्रकाश चव्हाण,श्रीकांत दामले आदी संचालकानी केली.
यावेळी तालुका पंचायतीचे प्रभारी कार्यनिर्वाहक अधिकारी रमेश मेत्री यानी झाडाचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष बसू सानिकोप,अँड चेतन मणेरीकर,लैला साखर कारखाण्याचे एम डी.सदानंद पाटील, राजेद्र रायका,शहरातील नागरीक उपस्थित होते.