
#सर्वोत्कृष्ट विद्यार्थी नमन पाटील व विद्यार्थीनी स्नेहल पाखरे!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील मराठा मंडळ हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून वार्षिक बक्षीस वितरण समारंभ पार पडला.
यावेळी कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश गावडे व गुंडू गावडे उपस्थित होते.
प्रारंभी महाराज शिवाजी महाराजांचे प्रतिमेचे पूजन व घोषणा देण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे श्री गावडे यांनी महाराजांच्या जीवनाचे वर्णन करत असताना विद्यार्थ्याने क्रीडा क्षेत्राकडे देखील त्याच पद्धतीने लक्ष द्यावे. अशाप्रकारे विद्यार्थ्यांना पटवून सांगितले .
या संदर्भात शालेय विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे भाषणे झाले. गुणी विद्यार्थ्यांना विशेष बक्षीस सर्टिफिकेटच्या माध्यमातून पारितोषिक माध्यमात देण्यात आले .
यावेळी शालेय सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून कुमार नमन पाटील व सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून कुमारी शिवानी व जनरल चॅम्पियन म्हणून स्नेहल पाखरे यांची निवड करण्यात आले.
शेवटी अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक के.व्ही. कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात शिवरायांचे जीवनगाथा पटवून सांगत असतानाच शिवराज पुन्हा जन्माला या असे संबोधिले.
आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.