
#कुणाची वर्णी लागणार!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याचे बी ई ओ राजश्री कुडची या ३१ डिसेंबर रोजी बी ई ओ पदावरून निवृत्त झाल्या.त्या २२ जूलै २०२२ रोजी खानापूर बी ई ओ म्हणून रूजू झाल्या होत्या. जवळ पास आडीज वर्षाचा काळ त्यानी बी ई ओ अधिकारी म्हणून सेवा बजावली.
खानापूर तालुका हा अति दुर्गम व मागासलेला तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्याच्या मान, हुळंद,गवाळी,पास्टोली सारख्या भागात दळनवळणाची सोय नाही.अशा ठिकाणी जाऊन शैक्षणिक परिस्थीचा आढावा घेणे कठीण असताना खानापूरला महिला बी ई ओ अधिकारी म्हणून राजश्री कुडची यानी आडीज वर्षाचा काळ पार पडला.
एकेकाळी खानापूर तालुक्यात पूरूषानी बी ई ओ अधिकारी म्हणून सेवा बजावताना अनेक बरे वाईट प्रसंग काढले. त्यानंतर पहिली महिला बी ई ओ म्हणून उमा बडगेर यानी खानापूर तालुक्यात सेवाबजावली त्यानंतर राजश्री कुडची यानी बी ईओ म्हणून आडीज वर्षाचा काळ सेवा केली.
यापुढे ही दुर्गम तालुका म्हणून ओळखणार्या खानापूर तालुक्याला महिला बी ई ओ पुन्हा येण्याची चर्चा सुरू आहे.
खानापूर तालुका मराठी बहुभाषिक तालुका म्हणुन ओळखला जातो. खानापूर तालुक्यात ८० टक्के मराठी भाषिक तर केवळ २० टक्के कन्नड भाषिक असुन मराठी शाळा जास्त आहेत. त्यामुळे बी ई ओ अधिकारी म्हणून येणार्या अधिकार्याना मराठी भाषेची ओळख असणे गरजेचे आहे.
तेव्हा लोकप्रतिनिधीनी खानापूर तालुक्याला येणार्या बी ई ओ अधिकार्याना मराठी भाषेची ओळख असणार्या अधिकार्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करने गरजे आहे.तर मराठी शाळा टिकणार नाहीतर पुन्हा मराठी शाळाना गळती लागणार.
तेव्हा खानापूर तालुक्यासाठी बी ई ओ अधिकारी म्हणून कुणाची वर्णी लागणार आणि तालुक्याचा शैक्षणिक दर्जा कसा उंचावणार हे पहावे लागणार.