
#जखमीचा पाय निकामी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरापासुन काही अंतरावर असलेल्या गोवा क्राॅसजवळ खानापूरहुन करंबळकडे भरधाव वेगाने जाणार्या कारवरचे नियंत्रण सुटल्याने त्यातच चालकाचा निष्काळजीपणा होऊन गोवा क्राॅस व रूमेवाडी फाट्यानजीक कार पलटी होऊन झालेल्या आपघातात कार चालक लोकेश तुकाराम बेकणे याच्या उजव्या पायावर कार पलटी झाल्याने पाया निकामी झाला. तर कार मधील रामा नागेंद्र चोपडे हा सुध्दा जखमी झाला.
जखमीनी लागलीच खानापूर सरकारी दवाखाण्यात उपचारासाठी पाठविण्यात आले.त्याना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बेळगाव येथे पाठविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलिसानी घटनास्थळी दाखल होऊण पंचनामा केला.
पोलिस पुढील तपास करत आहे.