
#मणतुर्गा,शेडेगाळी,हारूरी,नेरसा,आदी भागात प्रचंड पाठींबा!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरासह तालुक्यात एक जुनी बॅक म्हणून खानापूर को.आँप बॅकेची ओळख आहे. गेल्या पाच वर्षात विद्यामान संचालकानी प्रगती साधली आहे. असे मत बॅकेचे विद्यमान चेअरमन व सहकार पॅनेलचे उमेदवार अमृत शेलार यानी मणतुर्गा,शेडेगाळी, भागात शुक्रवारच्या प्रचार सभेत बोलताना सांगीतले.
की,खानापूर को आँप.बॅकेची पंचवार्षिक निवडणूक येत्या रविवारी दि.१२ जानेवारी रोजी येथील समर्थ इंग्रजी शाळेत होणार तेव्हा तालुक्यातील खानापूर को.आँप.बॅकेच्या सभासदानी बॅकेच्या जुन्या संचालकांच्या सहकार पॅनलला भरघोस मतदान करून पँनलच्या सर्व उमेदवाना निवडुण आणा.असे आवाहन केले.
खानापूर कोआँप बॅकेची हित लक्षात घ्या!
यावेळी डाॅ.सी जी पाटील बोलताना म्हणाले की ,सध्याच्या काळात सहकार क्षेत्र सांभळणे म्हणजे तारेवरची कसरत आहे.
सहकार क्षेत्रात टिकायचे असेल तर बॅकेच्या उत्तरोत्तर प्रगतीच्या वाटेन वाटचाल करणार्या अनुभवी व जुन्या उमेदवाराना यामध्ये संधी देणे हिताचे आहे. तेव्हा सर्व सभासदानी सहकार पॅनला पाठींबा देऊन भरघोस मतदान करावे.असे आवाहन केले.
# बॅकेच्या १९०० मतदारानी सहकार पॅनला मतदान करा!
रमेश नार्वेकर बोलताना म्हणाले की,
खानापूर को.आँप.बॅकेच्या निवडणुकीसाठी पात्र असलेल्या जवळपास १९०० मतदारानी संस्थेचे हित लक्षात घेऊन व दुर दृष्टीने प्रयत्न करणार्या संचालकाला निवडुन देणे गरजेचे आहे. दोन पॅनल असले तरी सहकारी पॅनलमधील उमेदवार हे अनुभवी आहेत. व प्रगतीचा विचार करणारे आहेत. विद्यामान चेअरमन अमृत शेलार याच्यानेतृत्वाखाली निवडणुक लढविणार्या सहकार पॅनला पाठींबा जाहिर करून भरघोस मतानी निवडणु आणा.
असे आवाहन केले.
यावेळी विद्यमान चेअरमन अमृत शेलार,परशराम गुरव,विठ्ठल गुरव,मेघशाम घाडी,डाँ.सी जी पाटील,रविंद्र देसाई,रमेश नार्वेकर,विजय गुरव,मारूती बिलावर,अनिल बुरूड, अंजली कोडोळी,अंजुबाई गुरव आदी उमेदवार तसेच सभासद उपस्थित होते.