
#पराभवाच्या भितीने आरोप ,अमृत शेलार यांचा दावा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर को.आँप.बॅकेच्या विकासासाठी विद्यमान संचालक प्रयत्न करत आहेत.त्यानी विविध योजना राबवुन केलेल्या कामावर सभांदाचा पूर्ण विश्वास आहे.त्यामुळे सहकार पॅनलचा विजय हा नक्कीच आहे. त्यामुळे विरोधकानी पराभवाची धास्ती घेतली आहे. पराभवाच्या भिती पोटी ते खोटे आरोप करत मतदारांची दिशाभूल करीत असल्याचे मत खानापूर को.आँप.बॅकेचे विद्यमान चेअरमन व सहकार पॅनलचे उमेदवार अमृत शेलार यानी संदेश क्रांतीशी बोलताना व्यक्त केले.
खानापूर को.आँप बॅकेला सुसज्ज लाॅकरची सोय.त्यातुन वर्षाला साडेतीन लाखाचा नफा,नुतन शाखा वाढीने बॅकेच्या विकासात प्रगती,आम्ही नियमाचे पालन केले आहे. ज्याना बॅकेचे नियम, व्यवहार याबद्दल गंध नाही.अशा मतलबी लोकाकडुन आरोप करणे चुकीचे आहे.व त्याना हे शोभत ही नाही.असे स्पष्ट अमृत शेलार यानी बोलताना सांगीतले.
ज्या मतलबी लोकानी बॅकेत केवळ आपली पोळी भाजुन घेण्यासाठी सर्वसामान्य सभासदाना वेठीस धरले.अशाच्या सांगण्यावरून आरोप करणे कितपत योग्य आहे.ऐवढेच नव्हेतर ज्यानी आरोप केले ते किती प्रामाणिक आहेत.
आम्ही केवळ नी केवळ बॅकेच्या विकासाच्या मुद्यावर निवडणुक लढवित असल्याचे उमेदवार अमृत शेलार यानी सांगीतले.
पुढे म्हणाले शंभर वर्षाची परंपरा असलेल्या बॅकेच्या संचालक मंडळातुन बाहेर पडलेल्याना बॅकेच्या विकासासाठी काय योगदान दिले याचा खुलासा करावा.
त्यानी नोकरभरतीत विद्यमान सचालकावर आरोप केला.त्याच्या खोट्या बिनबुडाच्या आरोपावर सभासदाचा थोडाही विश्वास नाही. आम्ही विद्यमान संचालक सभासदावर कुटंबाप्रमाणे नाते जपले आहे.ते नाते पुढे ही जपणार आहे.याची खात्री सभासदाना आहे.त्यामुळे सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारा भरघोस मतानी निवडुन देणार व विजय नक्की आहे.असा विश्वास व्यक्त केला.
त्यामुळे तालुक्याच्या प्रत्येक गावातुन सहकार पॅनला उदंड प्रतिसाद मिळत आहे.असे सांगीतले.