
#विकास पॅनलचा एकच उमेदवार विजयी!
#निवडणुकीत शेलारांच्या सख्या भावाचा विजय!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सूहास पाटील )
खानापूर शहरातील सर्वात जुनी अर्बन बॅक म्हणून ओळखल्या जाणार्या सध्याची खानापूर को.आँप.बॅकेची पंचवार्षिक निवडणुकीची मत मोजणी तब्बल महिण्यानंतर शनिवारी दि.८ फेब्रुवारी रोजी बॅकेच्या सभागृहात पार पडली.
जुन्या व विद्यमान संचालकानी सहकार पॅनल मधुन निवडणुक लढविली तर विकास पॅनल मधुन नविन उमेदवारानी निवडणुक लढविली.
एकूण २८ उमेदवार!
सहकार पॅनलचे १३ ! विकास पॅनलचे १३ ! अपक्ष २ उमेदवार!
# सहकार पॅनलचे विजयी उमेदवार!
सामान्य गटातील
विद्यमान चेअरमन अमृत महादेव शेलार १०९६ मते,परशराम रा.गुरव, ८५५ मते, विठ्ठल निं.गुरव ७४६ मते, मेघशाम घाडी ९४८ मते, डाॅ.सी जी पाटील ७९० मते, रमेश श.नार्वेकर ७१२ मते.
विकास पॅनलचे एकच उमेदवार बाळासाहेब शेलार ८०२ मते विजयी.
महिला गट! विजयी
अंजली कोडोळी ९४८ मते,अंजुबाई गुरव १०२४ मते.
मागास अ गट विजयी !
विजय देवाप्पा गुरव,१०५१ मते.
मागास ब गट विजयी!
मारूती बाबूराव पाटील. ९८५ मते.
अनुसूचित जाती गट विजयी !
मारूती अप्पूसिंग बिलावर ८४६ मते.
अनुसुचित जमाती गट विजयी !
अनिल शिवाजी बुरूड ८७१ मते घेऊन
हे सर्व उमेदवार सहकार पॅनल मधुन भरघोस मतानी निवडूण आले असे आहेत.
यावेळी निवडणूक अधिकारी रविद्र पाटील यानी खानापूर को आँप.बॅकेचा निकाल सुरळीत हाताळला. यावेळी पोलिस बंदोबस्त होता.
निकाल लागताच सहकार पॅनलच्या सहकार्यानी गुलाल उधळुन व फटाक्यांच्या आताषबाजी करून विजयो उत्सव साजरा केला.