
#शिवस्मारक चौकात प्रतिमेचे दहन!
#तहसीलदाराना निवेदन !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यानी महामानव डाॅ.बी आर आंबेडकर बद्दल केलेल्या टिपणीबद्दल खानापूर तालुका काॅग्रेस पक्षाच्यावतीने निषेद व्यक्त केला.
प्रारंभी खानापूर शहरातील शिवस्मारक चौकात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करत प्रतिमेचे दहन केले.त्यानंतर अमित शहांच्याविरोधात जोरधार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
त्यानंतर मोर्चाने जाऊन तहसील कार्यालयात घोषणाबाजी करत तहसील कार्यालय दणाणुन सोडले.
यावेळी बोलताना खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी म्हणाले की,डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाशिवाय आज अमित शहा गृहमंत्री झाले नसते.ऐवढेच नव्हेतर नरेंद्र मोदी आज पंतप्रधान झाले नसते.
तेव्हा अमित शहानी आंबेडकर ,आंबेडकर म्हणणे ही एक फँशन बनली आहे.असे सांगुन ,इतक्यावेळा देवाचे नाव घेतले असते तर स्वर्गात स्थान मिळाले असते.असे व्यक्तव्य करने चुकीचे आहे.
असे सांगुन डाॅ.बाबासाहेब आंबेडकरामुळे समताआणि सन्मानाचे जीवन देशातील अनेक नागरीकाना मिळाले आहे.जोपर्यत आपला श्वास आहे .जो पर्यत आकाशात चंद्र ,सुर्य आहे.तो पर्यत डाॅ.बाबासाहेब आंबेडकराची स्मृती अखंड राहिल. जर आपला देश व लोकशाही टिकवायची असेलतर संविधानाला पर्याय नाही.हेवेळीच आपण लक्षात घेतले पाहिजे .असे विचार व्यक्त करून केंद्रीय मंत्री अमित शहांच्या व्यक्तव्याचा निषेद केला.
यावेळी शहर अध्यक्ष महांतेश राऊत, नगरसेवक लक्ष्मण मादार,गौसलाल पटेल,जॅकी फर्नाडीस , यशवंत बीरजे,चंबाना होसमनी,सावित्री मादार आदीनी आपल्या भाषणातुन निषेध व्यक्त केला.
यावेळी तहसीलदार प्रकाश गायकवाड याना निवेदन सादर करून सरकारकडे निवेदन पाठविण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी निवेदनाचा स्विकार करून तहसीलदार प्रकाश गायकवाड यानी निवेदन सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देताना काॅग्रेस नेते सुरेश जाधव, महादेव कोळी, प्रसाद पाटील,नगरसेवक तोहिद चांदखन्नावर,इसाक पठाण,विनायक मुतगेकर,गुडू टेकडी,देमाना बसीरकट्टी,अभिषेक होसमनी,रामचंद्र पाटील, इलाकत बिचन्नावर,अभिषेक शहापूर,ईश्वर बोबाटे तसेच महिला अनिता दंडगल,दीपा पाटील,वैष्णवी पाटील,इतर महिला तसेच शेकडो काॅग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपसथी होते.