
उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस!
#यंदाची निवडणुक रंगतदार होणार!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील प्रसिध्द असलेली अर्बन बॅक सध्याची खानापूर को आँप बॅकेची पंच वार्षिक निवडणुक रविवारी दि. १२ रोजी होणार आहे . यापंचवार्षिक निवडणुकीकडे खानापूर शहरासह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागुन आहे.
आता पर्यत जुन्या संचालकांचीच गेल्या कित्येक वर्षा पासुन मक्तेदारी होती. मात्र जुन्या संचालकातील काही संचालक विद्यामान संचालकाच्या विरोधात नविन पॅनल उभारून निवडणुक लढविणार असल्याची चर्चा सुरू आहे.
खानापूर को.आँप.बँकेच्या १३ जागासाठी निवडणुक होणार आहे. या १३ जागा पैकी ७ जागा सामान्य गटासाठी ,सामान्य महिला,”अ” वर्ग एक ” ब ” वर्ग एक, “अनुसाचीत जाती” एक , “अनुसुचीत जमाती ” एक, अशा जागासाठी निवडणुक होणार आहे.
सध्या उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात असुन उद्या शनिवारी दि.४ रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
रविवारी दि ५ रोजी अर्जाची छाणणी होणार आहे. तर सोमवारी दि.६ रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.
त्यानंतरच खानापूर ( अर्बन ) को.आँप.बॅकेच्या निवडणुकीची चित्रे स्पष्ट होणार आहे.