
#सहकार पॅनल विरूध्द विकास पॅनल झुंज!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर को.आँप.बॅकेची चुरशीच्या निवडणुकीला रविवारी दि १२ रोजी येथील समर्थ इंग्रजी शाळेत सकाळी ९ वाजता प्रारंभ झाला.
या बँकेच्या विद्यमान संचालकाच्या सहकार पॅनल विरूध्द विकास पॅनल अशी लढत सुरू आहे.
सकाळी ९ वाजल्या पासुन मतदान प्रारंभ झाला. दुपारी १२ वाजे पर्यत मतदारानी गर्दी केली होती.दोन्ही पॅनलचे उमेदवार मतदारांच्याकडे मताची याचना करत होते.
मारूती नगर येथील समर्थ इंग्रजी शाळेच्या परिसरात मतदारानी मोठी गर्दी केली होती.
शिस्तीने मतदार मतदानच्या ठिकाणच्या जाऊन शांततेत मतदान करून येत होते.
मतदान शांततेत पार पडावे. यासाठी पोलिस फाटा सज्ज होता.
निवडणुक अधिकारी रवी पाटील मतदान केद्रावर लक्ष ठेवुन होते.पोलिसानी मतदाराना ओळख पत्र बघुन आत सोडत होते.
ग्रामीण भागातील मतदाराचा मोठ्या संख्येने उपस्थिती.
खानापूर तालुक्याच्या खेड्यापाड्यातील मतदारानी खानापूर को.आँप.बॅकेच्या चुरशीच्या निवडणुकी बर्या पैकी उपस्थिती लावली होती. सकाळच्या सत्रात खानापूर शहरातील मतदारानी चांगली उपस्थिती दर्शविली.शांतेत मतदान केले. ग्रामीण भागातील मतदार हे रविवारचा खानापूरचा आठवडी बााजार असल्याने मतदाना बरोबर आठवड्याच्या बाजाराला आले होते. त्यामुळे सायंकाळी चार वाजे पर्यत मतदान चुरशीने होणार आहे.
खानापूर को.आँप.बॅकेच्या निवडणुकी २ पॅनल व २ अपक्ष असे २८ उमेदवार!
खानापूर को.आँप.बॅकेच्या पंचवार्षिक निवडणुक चुरशीने सुरूवात झाली.विद्यमान संचालकाच्या सहकार पॅनल विरूध्द विकास पॅनल गटातुन उमेदवार रिंगणात आहेत.दोन्ही गटाचे २६ व दोन अपक्ष असे एकूण २८ उमेदवार रिंगणात आहेत.दिवसभर समर्थ शाळेच्या परिसरात उमेदवारासह मतदारांची गर्दी दिसुन येत होती.
बॅकेच्या निवडणुकीत प्राथमिक टप्प्यात१९२१ मतदार होते. मात्र दोन्ही पॅनलनी पात्र मतदारांची संख्या वाढवुन एका पॅनलने ४२० तर दुसर्या पॅनलने ५२० मतदाराची संख्या वाढवून आणल्याने आता मतदाराची संख्या आता २८६५ होऊन मतदार मतदानाचा हक्क बजाणार आहेत.
आज सायंकाळी ४ वाजल्यानंतर मतदान प्रक्रिया संपल्यानंतर किती टक्के मतदान झाले हे कळणार होते
मात्र आजच्या निवडणुकीच्या निकाल न्यायालयीन प्रक्रियेमुळे लांबणीवर पडला आहे.सध्या खानापूर को.आँप.बॅकेवर विद्यमान चेअरमन अमृत शेलार याच्या पॅनलची सत्ता आहे.
नुकताच झालेल्या नोकर भरतीच्या निवडीनंतर माहीती हक्काखाली उमेदवाराने न्यायालयीन दावा ठोकल्याने निवडणुकीचा निकाल लांबणीवर पडणार.त्यामुळे उमेदवारातुन निराशा दिसुन येत आहे.