
# पैकी १३ संचालकाची बीनविरोध निवड!
#दि.२८ नोव्हे.रोजी निवडणुक!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका पी एल डी बॅकेची पंचवार्षिक निवडणुक येत्या दि.२८ रोजी होणार .या पंचवार्षिक निवडणूकीत १५ संचालका पैकी १३ संचालकाची बीनविरोध निवड झाली .तर २ संचालकासाठी चुरशीची निवडणुक होणार आहे.
याबीनविरोध निवडणुकीत मुरलीधर पाटील (जळगा),अशोक पाटील (चिक्कदिनकोप),सदीप पाटील (इटगी),नारायण पाटील(बिजगर्णि),
लक्ष्मण कसर्लेकर(आमटे),निंगापा गुरव (हलशी),तर महिला गटातील दोन जागासाठी लक्ष्मी शिवाप्पा पाटील (तिवोली),सुलभा आंबेवाडकर (बेकवाड),आदीची बीनविरोध निवड झाली आहे.
तर सुनिल पाटील (माळ अंकले),अल्प संख्याक गटातुन कुतुबुद्दिन बिच्चन्नावर( माडीगुंजी), अनसुचीत जाती गटातुन यमनाप्पा राठोड (खानापूर),अनुसुचीत जमाती गटातुन श्रीकांत करजगी (गोल्लिहाळ), बीनकर्जदार गटातुन शंकर सडेकर (जांबोटी) यांची बीनविरोध निवड झाली आहे
कर्जदार गटातुन निवडणुक!
कर्जदार गटातुन २ जागासाठी दि २८ रोजी निवडणुक होणार आहे.
गर्लगुजी मतदार संघातुन विरूपाक्ष पाटील(बरगाव) व तानाजी कदम (निडगल),तर कक्केरी मतदार संघातुन प्रकाश अंग्रोळी व निळकंठ गुंजीकर या़च्यातुन चुरशीची निवडणुक होणार आहे.
या पी एल डी बॅकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यामान चेअरमन मुरलीधर पाटील याची सतत चौथ्यांदा संचालक पदी निवड झाली आहे.