
विज्ञान विषयाचे शिक्षक!३३ वर्षे सेवा!
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण शुभम गार्डन कार्यालयात गुरूवारी दि.५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिना निमित्त खानापूर मराठा मंडळ हाय्यर सेंकडरी स्कूलचे विज्ञान शिक्षक एस एम मुतगी याना यंदाचा २०२४-२५ सालाचा खानापूर तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार अवरोळी मठाचे स्वामी चन्नबसव देवरू यांच्या सान्निध्यात पार पडलेल्या कार्यक्रमात आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र, मानचिन्ह, शाल ,पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.
यावेळी तहसीलदार प्रकाश गायकवाड, कर्नाटक राज्य माध्यमिक शाळा व काॅलेज नोकर संघाचे प्रधान कार्यदर्शी सल्लिम कित्तूर व बीईओ कार्यालयाचे अधिकारी व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
विज्ञान शिक्षक एस एम मुतगी हे २१ जुन १९९१ साली शिक्षकी सेवेत मराठा मंडळ हायस्कूलमध्ये रूजू झाले.
गेली ३३ वर्षे विज्ञान शिक्षक म्हणून सेव करत असताना सन २०२४ साली विजयवाडा (ए .पी.)येथे राष्ट्रीयस्थरीय विज्ञान एक्झ्यूबीशेन मध्ये विज्ञान माॅडेल सादर करून खास बक्षिस प्राप्त केले आहे.
त्याच्या या यशाबद्दल यंदाचा खानापूर तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आला.