
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
#तालुक्याच्या विकासाला खिळ!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याच्या ठिकाणी तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी (ई.ओ.) व बी.ई.ओ. ही दोन्ही पदे रिक्ते झाल्याने तालुका पंचायतीच्या त्याचबरोबर शैक्षणिक विकास कामाना खिळ बसण्याची लक्षण दिसत आहेत.
३१ डिसेंबर २०२५ रोजी खानापूर तालुक्याच्या बी.ई.ओ. सेवानिवृत्ती झाल्या. त्यामुळे बी.ई.ओ.अधिकारी पद ही रिक्त झाल्याने आता तालुक्याच्या शैक्षणिक विकासाकडे दुर्लक्ष होणार.
त्यामुळे तालुका पंचायतीच्या कार्यनिर्वाहक अधिकारी व बी.ई.ओ.अधिकारी ही दोन्ही रिक्त पदे लवकरात भरून खानापूर तालुक्याच्या पंचायत विकासाच्या कामाना तसेच खानापूर तालुका शैक्षणिक विकासाना चालना देण्यासाठी तालुक्याच्या लोकप्रतिनिधीनी लवकरात लवकर अधिकार्याच्या नेमणुकीसाठी प्रयत्न करावे.
अशी मागणी खानापूर तालुक्याच्या नागरीकांतुन होत आहे.