
#अध्यक्ष हणमंत गुरव!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेची महत्वाची बैठक सोमवारी दि.३१ रोजी दुपारी ३ वाजता खानापूरातील कवळेमठात बोलविण्यात आली आहे.
याबैठकीत सालाबाद प्रमाणे यंदाही यावर्षीचा कुस्ती आखाडा भरविण्याची तारीख ठरविण्याबाबत तसेच कुस्तीचे नियोजन आणि पैलवानांच्याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहेत.
तालुक्यातील कुस्तीगीर संघटनेच्या आजी, माजी पदाधिकार्यानी बैठकीला उपस्थित राहुन सुचना मांडाव्यात.असे आवाहन कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष हणमंत गुरव ( गणेबैल ), सेक्रेटरी सदानंद होसुरकर, कार्याध्यक्ष राजाराम गुरव यांनी केले आहे.