
#श्रीगोरखनाथ मंदिर किरावळे (माडीगुंजी)!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
किरावळे (माडीगुंजी) ( ता.खानापूर) येथील श्री गोरखनाथजी मंदिर किरावळे मठाच्या परिसरात रविवारी दि.९ रोजी सकाळी नुतन छत निर्माण व जलकुंभ निर्माण शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.श्री.१००८पिरयोगी मंगलनाथजी
मठाधीश गोरखनाथ मठ किरावळे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी भुमी पुजन आमदार विठ्ठलराव हलगेकर,माजी आमदार व डी सी सी बॅक संचालक अरविंद पाटील ,डाॅ.प्रकाश पी के एम, भाजपा बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, संजय कुबल तालुका माजी अध्यक्ष भाजपा यांच्याहस्ते होणार आहे.
यावेळी दीपप्रज्वलन अमृत शेलार चेअरमन अर्बन बॅक खानापूर,मुरलीधर पाटील चेअरमन पी एल डी बॅक खानापूर,धनश्री सरदेसाई सचीव भाजपा बेळगाव,बाबूराव देसाई , जोतिबा रेमाणी माजी जि प सदस्य यांच्याहस्ते होणार आहे.
विविध फोटोचे पुजन के पी पाटील ,निरंजन सरदेसाई,भाजप युवा नेता पंडित ओगले,सदानंद पाटील एम डी लैला शुगर्स ,अँड चेतन मणेरीकर,राजेंद्र रायका भाजप नेेते,राजू सिध्दाणी संचालक पी के पी एस गर्लगु़जी,वासंती बडगेर ,राजश्री देसाई माजी ता प सदस्य,अँड,जी जी पाटील,अँड.महादेव पाटील
,डाॅ.गंगाधर,डाॅ.मनोहर,डाॅ.उमेश, डाँ.विठ्ठल आदी मान्यवरांच्याहस्ते होणार आहे.
तरी कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन स्वगतोत्सव कमिटी सदस्यांनी केले आहे.