
#मान्यवरांची उपस्थिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
किरावळे (मांडीगुजी) ( ता. खानापूर ) येथील श्री गोरखनाथजी मंदिर किरावळे मठाच्या परिसरात जुलकुंभाचा कुदळ मारून शुभारंभ व मंदिरावर नुतन छत असा दुहेरी कार्यक्रम रविवारी दि ९ रोजी पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री श्री १००८ पिरयोगी मंगलनाथजी मठाधिश गोरखनाथ किरावळे उपस्थित होते
यावेळी दिपप्रज्वलन व भुमीपुजन आमदार विठ्ठलराव हलगेकर,डाॅ.प्रकाश पी के एम.,माजी भाजपा तालुका अध्यक्ष संजय कुबल, अर्बन बॅक चेअरमन अमृत शेलार, शिवसेना राज्य उपाध्यक्ष के पी पाटील, अँड. चेतन मणेरीकर, भाजप युवा नेत पंडित ओगले,माजी सभापती राजश्री देसाई, माजी ता प सदस्या वासंती बडगेर ,अँड.जी जी पाटील,महादेव पाटील ,राजाराम देसाई आदीच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी प्रास्ताविक उपस्थिताचे स्वागत भाजप नेते राजेंद्र रायका यानी केले.
यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की , किरावळे मठाचा विकास करण्यासाठी सरकारच्या निधी बरोबर प्रत्येकाच्या मदतीने झाले पाहिजे.
तेव्हा ग्राम पंचायतीच्या एनआरजी योजनेंतर्गत रस्त्याचे काम करण्यासाठी प्रयत्न करू.त्याचबरोजर वीज पुरवठा करण्यासाठी ही प्रयत्न करू. भाविकासाठी आंबेवाडी पर्यत बसेची सोय करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बोलताना सांगीतले.
यावेळी उपस्थित मान्यवरानी आपले विचार व्यक्त केले. तर आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचा पिरयोगी मंगलनाथी यांच्याहस्ते शाल,पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. आभार भाजप नेते राजेद्र रायका यानी मांनले.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी डाॅ.गंगाधर,डाॅ.मनोहर,डाॅ.उमेश,डाॅ.विठ्ठल तसेच कार्यकारी समिती सदस्य बलराज माने,घनश्याम राजपुरोहित,किरणसिंह पुरहित,राहुल पाटील,निलेश मोहनदास,दिपक देसाई (गुंजी),गुलशननाथजी आदीनी परिश्रम घेतले.