
#उद्या आम.विठ्ठल हलगेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज सोमवारी दि ६ जानेवारी ते दि ८ जानेवारी पर्यत शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या पटांगणावर तोपिनकट्टी संचालित श्री महालक्ष्मी ग्रूप व लैला शुगर्स यांच्यावतीने भव्य कृषी मेळावा व सरकारी योजनांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
यानिमित्त सोमवारी दि ६ रोजी सकाळी १० वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते कृषी मेळावा व सरकारी योजनांचे उदघाटन होणार आहे.
तर दुपारी ४ वाजता श्रीमहालक्ष्मी ग्रुप यांच्यावतीने “गौरव पुरस्कार” वितरण सोहळा व शेतकर्याना मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ७ वाजता सांस्कृतीक कार्यक्रम जागर लोक सांस्कृतीचा होणार आहे.
दुसरे दिवशी मंगळवारी दि. ८ रोजी सकाळी १० वाजता मान्यवराच्याहस्ते आरोग्य शिबीराचे उदघाटन होणार आहे.
तर सायंकाळी ४ वाजता शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्याचे स्नेहसंमेलन.
बुधवारी दि.८ रोजी सकाळी ११ वाजता शेतीतज्ञ व लघु उद्योग तज्ञाकडुन शेतकर्याना ऊस पिकाबद्दल व लघू उद्योगासाठी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन .दुपारी १२ वाजता समारोप व कृतज्ञता सोहळा होणार आहे.
तेव्हा संस्थेचे सभासद ,ग्राहक,शेतकरी व नागरीकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा . असे आवाहन श्रीमहालक्ष्मी ग्रुप व लैला शुगर्स यांच्यावतीने करण्यात आले आहे.