
#खादी व ग्रामोद्योग अयोग,सुक्ष्म,लघू व मध्यम उधोग मंत्रालय चेअरमन मनोज कुमार याची खास उपस्थिती!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर येथील केंद्रीय ग्रामीण कुंभारी इन्स्टीट्यूटच्या वतीने रविवारी दि.५ रोजी कुंभारकलाकाराना २६० कुंभारी चांकाचे वितरण करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर खादी व ग्रामोद्योग अयोग,सुक्ष्म,लघू व मध्यम उधोग मंत्रालय चेअरमन मनोज कुमार याची खास उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी आमदार विठ्ठलराव हलगेकर होते. त्याचबरोबर डाॅ.ई मोहनराव,मदन कुमार रेड्डी,प्रीयाजी पुराणिक,सत्यनारायण भट,सुमित्राम्मा दलवाई आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक सीईओ मदनकुमार रेड्डी यानी केले.
कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने व फोटो पुजनाने झाली.
यावेळी उपस्थित मान्यवराचा शाल,पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला
यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की, कु़ंभार व्यवसाय हा गेल्या हजारो वर्षापूर्वी पासुन आलेला धंदा आहे.मात्र अलिकडे नविन तंत्रज्ञानामुळे अधुनिक यंत्रसामुग्री वाढली. त्यामुळे कुंभारी धंदा मागे पडला.परंतू मातीच्या मडक्याचे महत्व फार मोठे आहे.तेव्हा नवीन युवकानी हा कुंभार धंदा जोपासावा. असे आवाहन केले.
यावेळी बोलताना केंद्रीय खादी व ग्रामोधोग आयोगाचे चेअरमन मनोज कुमार म्हणाले, की मातीच्या वस्तूचे मोठे योगदान आहे. कुंभारी कलेला प्रोहोत्सान देण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना आंमलात आणल्या आहेत.त्याचा लाभ कुंभार समाजाने घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी राज्यातुन आलेल्या २६० लाभार्थीना मान्यवरांच्याहस्ते कुंभार चांकाचे वितरण करण्यात आले.