
# मंदिराचा स्लॅब भरणी समारंभ!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
कुप्पटगीरी ( ता.खानापुर ) येथील दीड कोटी खर्च करून उभारण्यात येणार्या भावकेश्वरी मंदिराच्या गाभारा स्लॅब भरणी समारंभाचे औचित्य साधुन नुकताच पार पडलेल्या दि खानापूर को.आँपरेटिव्ह बॅकेच्या (अर्बन) नुतन संचालकाचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगाराम पाटील बांधकाम कमिटी सदस्य होते.
तर कार्यक्रमाला कुप्पटगीरी पंच मंडळी, ग्रामस्थ ,बिल्डींग कंत्राटदार लैला साखर कारखाण्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक संभाजी पाटील यानी केले.
कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली.
यावेळी उपस्थित मान्यवरााच्या हस्ते भावकेश्वरी मंदिराच्या गाभार्याचा स्लॅब भरणी करण्यात आला.
यावेळी दि खानापूर को.आँप.बँकेच्या (अर्बन )नुतन संचालकांचा शाल,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शंकर पाटील यानी केले.
आभार उमेश बुवाजी यानी मानले.