#नंदगड सह सन्नहोसुर, भंडरगाळी गावच्या लक्ष्मी यात्राना प्रारंभ!
#१२ दिवस चालणार यात्रा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील एकाच वेळी नंदगड ,सन्नहोसुर व भंडरगाळी गावच्या ग्रामदेवता लक्ष्मी यात्रा आज बुधवार दि.१२ पासुन ते दि २३ पर्यत चालणार आहे.
नंदगड लक्ष्मी यात्रेला प्रारंभ!
नंदगड गावच्या लक्ष्मी यात्रेला तब्बल २४ वर्षानी आज बुधवारी पहाटे प्रारंभ होऊन होम व अभिषेक झाल्यानंतर सकाळी ७ वाजुन ११ मिनीटानी सुर्योदयाला अक्षतारोपण झाल्या. त्यानंतर सकाळी लक्ष्मी देवीची मानाच्या मंदिराना भेट झाली. दुपारी १२ वाजता जुने गाव वतनदा व मानकर्याची भेट व ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी अक्षतारोपणासाठी तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येन उपस्थित होता.
यावेळी नंदगड गावच्या ग्रामस्थानी आहेर प्रथेला फाटा देऊण आहेर आणु नये .असे आवाहन केले आहे.
सन्नहोसुर ,भंडरगाळी लक्ष्मी यात्रा!
नंदगड गावसह सन्नहोसुर ,भंडरगाळी गावची ग्रामदेवता लक्ष्मी यात्रेला तब्बल १४ वर्षानंतर आज बुधवार दि १२ रोजी पहाटे य होम व अभिषेक होऊन सकाळी ७ वाजुन ११ मिनीटानी अक्षतोपणाने लक्ष्मी यात्रेची सुरूवात झाली.
यावेळी वतनदार व मानकर्याच्या ओट्या भरून भंडार्याची उधळण करत यात्रेला प्रारंभ झाला.
खानापूर तालुक्यासह बाहेरील भाविकानी लक्ष्मी यात्रेला हजारोंच्या संख्येन उपस्थिती लावली होती.