
#शहराच्या विकासासाठी सदैव पाठीशी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
खानापूर नगरपंचायतीच्या नुतन नगराध्यक्षा पदी नगरसेविका सौ. मिनाक्षी प्रकाश बैलुरकर याची बीन विरोध निवड झाली.
यानिमित्त माजी आमदार व एआयसीसीच्या सचीव डाॅ.अंजली निंबाळकर यांची नुतन नगराध्यक्षा सौ.मिनाक्षी प्रकाश बैलुरकर यानी आपले पती माजी स्थायी कमिटी अध्यक्ष व विद्यामान नगरसेवक प्रकाश बैलुरकर यांच्या समवेत भेट घेऊन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी माजी आमदार डाॅ.अंजली निंबाळकर याच्याशी चर्चा करून खानापूर शहरातील विविध विकास कामाविषयी चर्चा करण्यात आली.
खानापूर शहराच्या विकास कामासाठी माजी आमदार नात्याने मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन.अशी ग्वाही माजी आमदार व ए आय सी सी सचीव डाॅ. अंजली निंबाळकर यानी दिली.