
#निवडणुक अधिकारी म्हणून कृषी अधिकारी सतीश माविनकोप!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
माडीगुंजी ( ता. खानापूर ) ग्राम पंचायतीचे चेअरमन संतोष गुरव यांच्यावर अविश्वासाचा ठराव घातल्यानंतर गेल्या कित्येक दिवसापासुन चेअरमन पद रिक्त होते.
त्यामुळे मंगळवारी दि.२५ रोजी चेअरमन पदाची निवडणूक पार पडली. चेअरमन पदी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा माडीगुंजी परिसरात सुरू होती. परंतु चेअरमन पदी सौ.स्वाती जयकुमार गुरव याची बीन विरोध निवड करण्यात आली.
मंगळवारी दि २५ रोजी सकाळी ११ वाजता निवडणुक अधिकारी कृषीखात्याचे अधिकारी सतीश माविनकोप यानी निवडणुक प्रक्रियेला प्रारंभ केला.यावेळी सौ .स्वाती गुरव यांचा एकमेव अर्ज दाखल आल्याने सौ.स्वाती गुरव यांची चेअरमन पदी बीनविरोध निवड झाल्याचे जाहिर करण्यात आले .
लागलीच गुलालाची उधळन व फटाक्याची आतिषबाजी करत विजयोत्सव साजरा करण्यात आला.
नुतन चेअरमन सौ.स्वाती गुरव यानी गावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहुन नागरीकांच्या समस्या मार्गी लावण्याची ग्वाही दिली.
यावेळी ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष सर्व ग्राम पंचायतीचे सदस्य ,नोकरवर्ग व गावचे नागरीक उपस्थित होते.