
प्रा.मधुकर पाटील
#माळअंकले शाळेचा अमृतमहोत्सव सोहळा!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर (सुहास पाटील)
व्यक्तीला घडविण्याचे काम शाळा करते.शाळेतुन माणुस घडतो.तेव्हा प्रत्येकाने शाळेची आठवण ठेवणे ही काळाची गरज आहे. कारण शाळा हे ज्ञानाचे प्रतिक आहे. असे विचार शिवाजी विद्यापीठाचे सिनेट प्रा. मधुकर पाटील यानी माळ अंकले (खानापूर ) प्राथमिक मराठी शाळेच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात प्रमुख वक्ते यानात्याने बोलताना व्यक्त केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की,शाळा ज्ञानाचे मंदिर आहे. म्हणून शाळेत लिहिण्यापासुन वाचण्या पर्यत शिकविल जातं, म्हणून शाळा ही आईची भूमीका गुरूजी करतात . म्हणून मास्तर म्हणतात मास्तर म्हणजे मा म्हणजे आई ज्याना आईचा अस्तर प्राप्त होतो.तो मास्तर होय.
म्हणून शिक्षकाचा आदर करा.
अलिकडे मराठी शाळा टिकल्या पाहिजे असे प्रत्येकजन म्हणतो. यासाठी पालकानी आपली पाल्ये मराठी शाळेत पाठविली पाहिजेत.
तेव्हा प्रत्येकाने आपले कर्तव्य समजुन आपल्या शाळेकडे पाहिले पाहिजे तरच शाळा टिकणार असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरूवात ग्रंथदिडीने झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप दुर्गाराम निडगलकर होते.
कार्यक्रमाचे उदघाटन आमदार विठ्ठल हलगेकर व माजी आमदार दिगंबर पाटील व उपस्थित मान्यवरांच्याहस्ते फित कापुन करण्यात आले.
तर उपस्थित मान्यवरांच्या दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले आहे.
व्यासपीठावर माजी जि.प.सदस्य विलास बेळगावकर, निवृत्त मुख्याध्यापक ए.बी.मुरगोड, भैरू पाटील,म.ए.समिती कार्याध्यक्ष गोपाळ पाटील, ,माजी ता.प.सदस्य पांडुरंग सावंत,भाजप नेते सदानंद होसुरकर,भरमाणी पाटील,अर्बन बॅक चेअरमन अमृत शेलार,संचालक विठ्ठल गुरव,विजय गुरव,डाॅ.एल एच पाटील,रमेश देसाई,राजू सिध्दाणी, समाज सेवक यशवंत बीरजे,माजी ग्रा.पं सदस्य कृष्णा कुंभार, बाळगौडा पाटील,अनंत सावंत ,शिवाजी होसुरकर आदी उपस्थित होते.यावेळी मान्यवरांचा शाला,मानचिन्ह व पुष्पहार घालुन सत्कार केला.
यावेळी विनोद निडगलकर यानी अहवाल वाचन केले.
यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर,माजी आमदार दिगंबर पाटील ,विलास बेळगावकर इतर मान्यवरानी मराठी शाळा टिकल्या पाहिजे यासाठी प्रत्येक काळजी घेतली पाहिजेत तरच शाळा टिकतील असे विचार व्यक्त केले.
यावेळी माजी शिक्षक ,माजी विद्यार्थी आदीचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एम.पी.गिरी व बी ए.देसाई यानी केले.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्याध्यापिका,शिक्षकवर्ग ,विद्यार्थी व गावकर्यानी परीश्रम घेतले.