
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील)
खानापूर तालुक्यातील हेम्मडगा मार्गावरील रेल्वे पुलाचे काम चालू आहे. त्यामुळे मणतुर्गा हेमडगा मार्गे येणाऱ्या वाहनाच्या वर्दळीमुळे त्यातच मंणतूर्गा या गावातून वाहतुक वळविल्याने वाहनाची येजा . असोगा वरून खानापूरला होत आहे.
पण या वाहनाची वाहतुक गावातून होत असल्याने त्यातच गावात रस्ता अतिशय लहान असल्याने वाहतुकीची वर्दळ वाढली आहे .याचा त्रास गावातील लोकांना सहन करावा लागत आहे . तसेच वाहनाच्या वर्दळीमुळे घरात धुळीचे साम्राज पसरले आहे. आणि गर्दीच्या ठिकाणी अपघाताचा धोका सुद्धा वाढला आहे. चुकून एखादा अपघात घडला. तर त्या संबधीत रेल्वे पुलच्या कॉन्ट्रॅक्टरला जाब विचारला जाणार आहे. तेव्हा ही बाब महागात पडणार आहे. तेव्हा जे कोणी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी याची दखल घेऊन लवकरात लवकर पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी नाहीतर . येत्या चार दिवसात मणतुर्गा क्रॉस या ठिकाणी रास्ता रोको करण्याचा इशारा मणतुर्गा येथील माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब शेलार तसेच काँग्रेसचे नेते ईश्वर बोबाटे यांनी दिला आहे.