
#१५ मार्च रोजी खुले करण्याची होती तारीख !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील हेम्माड मार्गावरील मणतुर्गा रेल्वे फाटक दि. १५ मार्च पर्यत खुले करण्याचे आश्वासन सबंधीत कंत्राटदाने दिले होते. मात्र मार्च महिण्यात संपायला आला तरी अद्याप मणतुर्गा रेल्वेगेट वाहतुकीस मोकळे केले नाही.
त्यामुळे हेम्माडगा मार्गावरील वाहतुक सुरळीत नसल्याने वाहनधारकाना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामार्गावर दुचाकी व इतर वाहनाना येजा करताना अनेक समस्या निर्माण होत आहेत. अनेक दुचाकी स्वाराचे आपघात झाले आहेत.
दिलेल्या मुदतीत रेल्वे फाटक खुल्ले न केल्याने या भागातील नागरीकाना अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे. तेव्हा रेल्वे अधिकार्यानी लवकरच मणतुर्गा रेल्वे फाटक खुल्ले करण्याची मागणी सर्व थरातुन होत आहे.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते शांताराम पाटील म्हणाले की मणतुर्गा रेल्वे फाटकाचे काम १५ मार्चच्या आत पूर्ण करून रेल्वे फाटक वाहतुकी मोकळे करतो.असे सबंधित कंत्राटदाराने सागीतले होते. परंतु मार्च महिणा संपत आला. तरी या रेल्वे फाटकाचे काम पूर्ण झाले नाही.
तेव्हा तालुका आमदारानी तसेच सबंधित रेल्वे खात्याच्या अधिकार्यानी या समस्येकडे लक्ष देऊन रेल्वे फाटक वहातुकीस मोकळे करावे .असे बोलताना सा़गीतले.